मोदी सरकार गप्प का ? ; मणिपूरमधील घटनेविरूद्ध राष्ट्रवादीचं 'मौन' आंदोलन !

Edited by: विनायक गावस
Published on: July 25, 2023 11:40 AM
views 416  views

सावंतवाडी :  मणिपूर येथे घडलेल्या महिला हिंसाचाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडीतर्फे गांधी चौकात लाक्षणिक मौन आंदोलन करण्यात आलं. कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. मणिपुर येथील महिलांवर झालेल्या हिंसाचाराचा जाहीर निषेध यावेळी नोंदविण्यात आला. मणिपूर भारतात नाही का ? मोदी सरकार गप्प का ? बेटी बचाव, देश बचाव, बलात्काऱ्यांना फाशी झालीच पाहिजे अशी मागणी हाती पोस्टर घेऊन करण्यात आली.


यावेळी अर्चना घारे म्हणाल्या, भारताची मान शरमेन खाली जाईल अशी घटना देशात घडली आहे. हिंसाचार करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई अजून झालेली नाही. त्यासाठी सगळ्या महिलांनी गांधी चौकात मौन आंदोलन केलं आहे. वाहिन्यांच्या माध्यमातून समोर आलेली ती क्लिप बघून पायाखालची जमीन सरकली. ही घटना खरं असल्याच सिद्ध झाल्यावर महिला म्हणून प्रचंड वेदना झाल्या. दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढली. महिलांसोबत किळसवाणे प्रकार केले. माणूसकीला काळीमा फासणार हे कृत्य मणिपूरमध्ये घडलं. अडीच महिने उलटूनही केंद्र सरकार यावर अॅकशन घेत नाहीय. अशा निर्दयी लोकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे असं मत अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केलं.


याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. रेवती राणे, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सावंतवाडी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला शहाराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी, अल्पसंख्याक सेल महिला अध्यक्षा ॲड. राबिया शेख-आगा, तालूका उपाध्यक्ष प्रशांत पांगम, चराठे ग्रामपंचायत सदस्य गौरी गावडे, बावतीस फर्नांडिस, सरचिटणीस समीर सातार्डेकर, सुधा सावंत, श्रीकांत कोरगावकर, तौसिफ आगा, मारिता फर्नांडिस, मयुरी राऊळ,  श्रावणी कोरगावकर, शबीना बेग,  अनीशा सानगर, अनीशा शहा, समशाद शेख, साहिरा आगा, शहाबाज आगा आदि उपस्थित होते.