NCP चं बस स्थानकावर उद्या हल्लाबोल आंदोलन..!

Edited by: विनायक गावस
Published on: July 13, 2023 20:32 PM
views 139  views

सावंतवाडी : तळकोकणातील महत्त्वाचे शहर असणाऱ्या सावंतवाडी शहरातील बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत गेल्याच महिन्यात पाहणी करत तेथील आगारप्रमुखांना या व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याबाबत निवेदन दिले होते. परंतु जवळपास एक महिना होऊन देखील कुठल्याही प्रकारचा बदल तेथील दुरावस्थेमध्ये झालेल्या नाही, त्यामुळे  दिलेल्या इशाऱ्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडी व समस्त सावंतवाडीकर नागरिकांच्यावतीने सावंतवाडी बस स्थानकावर उद्या हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आंदोलनास सहभागी होत, प्रशासनास जाब विचारण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी केलं आहे.