
सावंतवाडी : शिंदे गटाच्या केसरकर समर्थकांनी आमच्या नेत्या अर्चना घारे-परब व माझावर वैयक्तिक टीका केली आहे. राष्ट्रवादीवर बोलण्यासारख त्यांच्याकडे काही नाही. तर केसरकर भाजपच्या ओसरीला गेल्यान ते भाजपवर बोलत नाहीत. जर दीपक केसरकर यांन मला काम दिली असतील, निधी दिला असेल किंवा माझं वैयक्तिक काम केलं असेल तर अनारोजीन लोबो यांनी ते जाहीर करावं, ते केल्यास मी राजकार सोडेन असं खुलं आव्हान राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिल आहे. सत्तेतील अडीच वर्षांत एका अधिकाऱ्यांकडून पक्ष निधी मागितला असेल तर राजकारण सोडून देईन. स्वताच्या कार्यकर्त्यांना काम न देणारे केसरकर आम्हाला कुठुन काम देणार असं मत त्यांनी व्यक्त केले.
तुम्हाला तुमच्या नेत्यांना जन्मच राष्ट्रवादीन दिला. ज्या तालुकाप्रमुखाला ग्रामपंचायत आणता आली नाही, स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही त्यांना माझावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. अर्चना घारे-परब यांच काम जनतेला ठावूक आहे. भाजप सोबत घेत नाही तरी त्यांच्या मागे का जाता ? जबरदस्ती युती का करता हे जाहीर करावं. तुमच्या पक्षाच अस्तित्व काय ते आधी शोधा मग आमच्यावर बोला. उपरे ची नेमकी व्याख्या जाहीर करावी नंतर त्यावर बोलेन असं मत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केले.
अनारोजीन लोबो यांना राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा असताना गाडी होती. आमच्या पक्षाच अस्तित्व त्या विचारत आहेत हेच दुर्दैव आहे. राष्ट्रवादी सोडून गेल्यावर तुम्हाला कोणत्या पक्षान साधी 'सायकल' तरी दिली का ? असा सवाल शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर यांनी केला. अर्चना घारे परब या सावंतवाडीतील कन्या आहेत. महिला दिनी मोठी भाषण करणाऱ्यांनी सिंधुकन्येला उपर म्हणन हे आपल्या सिंधू कन्येचा अपमान करणारा आहे असं मत राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष अँड सायली दुभाषी यांनी व्यक्त केले.
यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर महिला शहराध्यक्ष अँड. सायली दुभाषी जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी शहर चिटणीस राकेश नेवगी महिला जिल्हाध्यक्ष उद्योग व्यापार सौ. दर्शना बाबर देसाई अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष ईफ्तेकार राजगुरू तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस , उद्योग व्यापार तालुका उपाध्यक्ष याकूब शेख, सौ पूजा दळवी आदी उपस्थित होते.