
रोहा : राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे विरोधात अपशब्द वापरल्याने संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. रोह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात निदर्शने काढून त्यांच्या पुतळ्याला जोडामारो आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोहा नगरपालिका ते मारुती चौकपर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी रायगड जिल्हा माजी पालक मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील तालुका अध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर, विजयराव मोरे महिला अध्यक्ष प्रीतम पाटील युवक अध्यक्ष जयवंत मुंडे आधी कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांना निवेदन देऊन तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली