NCC मधून करिअर संधीवर कार्यशाळा

Edited by:
Published on: September 29, 2025 12:29 PM
views 121  views

दोडामार्ग : लक्ष्मीबाई सीताराम हळबे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात एन.सी.सी. विद्यार्थ्यांसाठी “एन.सी.सी. मधून करिअरच्या विविध संधी”  या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना विभाग मार्फत विद्यार्थी विकास घडविण्यासाठी अनेक उपक्रम आयोजित केले जातात. एन.सी.सी. मधून विद्यार्थ्यांना भविष्यात करिअर बाबत विविध संधी आणि क्षेत्र असतात याची विद्यार्थांना माहिती आणि मार्गदर्शन देण्यासाठी  या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळे साठी  प्रमुख पाहुणे आणि प्रवक्ते म्हणून सेवा निवृत्त सुभेदार संभाजी डांगे हे उपस्थित होते. तर कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून प्र. प्राचार्य डॉ. एस. एन. जाधव आणि  लेफ्ट. डॉ. पी. एन. ढेपे, आय.क्यू.ए.सी. विभाग प्रमुख प्रा. डी. वाय. बर्वे  हे उपस्थित होते. या कार्यशाळेतून भारतीय सैन्य व्यवस्थापन आणि नौकरी च्या विविध संधी बाबत विद्यार्थ्यांना उपस्थितांना  माहिती आणि मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांचा बहुगुण संपन्न विकास घडविण्यासाठी  महाविद्यालयात विविध  उपक्रम प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांच्या संकल्पनेतून    आयोजित केले जातात. आजच्या आधुनिक युगात विविध क्षेत्रात नित्य नवे  बदल घडून येत आहेत. या मध्ये करिअर संधीच्या क्षेत्रात सुद्धा ऑनलाईन पद्धतीमुळे अनेक  बदल   झाले आहेत. विविध वेबसाईट माध्यमाने विद्यार्थ्यांना करिअर साठी  नोकरीचे अर्ज सादर करावे  लागतात. एन.सी.सी. शिक्षणातून महाविद्यालयीन स्तरावर बी आणि सी  प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात सेवा अर्ज सादर करता येतो.

याबाबतची संपूर्ण माहिती एन. सी. सी. विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे. भारतीय सैन्यतील विविध क्षेत्र आणि करिअर साठी असलेली विविध पदांसाठी अर्ज कसा करावा व अर्ज करण्याची ऑनईन पद्धतीचे स्वरूप या बाबतची संपूर्ण माहिती महाविद्यालयातील एन.सी.सी. विद्यार्थ्यांनाया कार्यशाळेच्या माध्यमाने देण्यात आली.

या कार्यशाळेच्या सुरुवातीस आयोजक लेफ्ट. डॉ. पी. एन. ढेपे यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यशाळेचा उद्देश सादर केला यानंतर मान्यवरांच्या हस्ते मंगलमय दिप् प्रज्वलानातून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. या कार्यशाळेचे प्रमुख अतिथी आणि प्रवक्ते म्हणून लाभलेले सुभेदार मा. संभाजी डांगे यांनी विद्यार्थ्यांना एन.सी.सी. मधून बी आणि सी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्या नंतर भविष्यात असलेल्या करिअरच्या विविध संधीबाबत माहिती दिली. स्थल सेना, वायू सेना आणि जल सेनेचे  व्यवस्थापन कार्य  बाबत माहिती देऊन  त्यातील सेवेची विविध संधी साठी अर्ज कसा करावा याचे मार्गदर्शन  त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

यासाठी एन.सी.सी. च्या माध्यमाने करिअर घडविताना काय परिश्रम घ्यावे लागतात याची जाणीव जागृती त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली आणि करिअर सोबतच भक्ती आणि राष्ट्र सेवेची प्रेरणा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. कार्यशाळेचे अध्यक्ष प्र. प्राचार्य डॉ. सोपान जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात एन.सी.सी. शिक्षण हे करिअर साठी सुवर्ण संधी आहे.  महाविद्यालया मार्फत या संधी चा लाभ घेऊन उत्तम करिअर घडविता येते त्या साठी विद्यार्थ्यांनी एन.सी.सी. मध्ये सहभागी व्हावे  असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

या कार्यशाळेसाठी सूत्रसंचालन विद्यार्थी प्रीती जाधव यांनी केले तर आभार कु. सेलिना लोबो  यांनी मानले. या कार्यक्रमात  मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.