मालवण : मालवण किनारपट्टी येथे साजरा होणाऱ्या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने वायरी ग्रामपंचायत येथे बैठक घेत प्रशासन व ग्रामस्थांना सूचना दिल्या.
काही मार्गांवरील वाहतूक बदलली जाणार आहे. मासेमारी, पर्यटन याबाबत काही नियोजन केले जाणार आहे. सार्वजनिक सेवे बाबत काही नियोजन केले जाणार आहे. याबाबत अधिकृत माहिती लवकरच प्रशासनाच्या वतीने नागरिकांना दिली जाणार आहे. कोणत्याही अफ़वावर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये.
किनारपट्टीवरील नौसेना दिन कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांना दोन्ही बाजूने स्क्रीन तसेच अन्य सेवा दिल्या जातील. मात्र बैठक व्यवस्था पास या सर्व बाबी लवकर जाहीर होतील. अश्या अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.
दरम्यान वायरी तंटामुक्ती अध्यक्ष भाई मांजरेकर यांनी वायरी भूतनाथ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांचे सर्व सहकार्य प्रशासनास सर्वातोपरी लाभेल. असे डीवाय एसपी आढाव व पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांना सांगितले.