शिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळच्या वतीने नवरात्रोत्सव..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 13, 2023 13:22 PM
views 261  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील शिरवल गावचे सुपुत्र, युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे शिरवल खासकीलवाडी येथे नवरात्रोत्सव चे आयोजन करण्यात आले आहे. विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे.

१५ ऑक्टोबर रोजी सकाळी घटस्थापना केल्यानंतर आरती आणि तीर्थप्रसाद वाटप होणार आहे. २१ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता महिला भजनी बुवा ऋतुजा पाळेकर आणि अंकिता गावडे यांचा २०×२०  डबलबारी सामना होणार आहे. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी वाजता भंडारा (महाप्रसाद ) चा लाभ भाविकांना मिळणार आहे. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८ वाजता भंडारा (महाप्रसाद ) वाटप केले जाणार आहे.

रात्री ८ ते १० या वेळेत कुडाळ तालुक्यातील पावशी येथील सखी फुगडी संघाचा सुप्रसिद्ध फुगडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.