राष्ट्रवादीच वैभव पुन्हा मिळवून देऊ : अर्चना घारे

Edited by: विनायक गावस
Published on: October 27, 2023 11:58 AM
views 282  views

दोडामार्ग : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत दोडामार्ग तालुक्यात पार पडला. यावेळी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी प्रास्ताविक व्यक्त करताना मतदारसंघातील व्यथा मांडल्या. तर संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या आगमनानं सिंधुदुर्गात नवचैतन्य निर्माण झाल असून कोकणात राष्ट्रवादीच वैभव पुन्हा मिळवून देऊ असा विश्वास अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केला‌.


त्या म्हणाल्या, महिला खासदार असणाऱ्या संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राचा आवाज देशात बुलंद केला. आज त्यांच जंगी स्वागत या ठिकाणी झालं. सावंतवाडी मतदारसंघात तीन तालुके येतात. हा मोठा मतदारसंघ आहे. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग कोकणात आहे. कोकणातील अर्थकारण बदलण्यात शरद पवार यांचा वाटा मोठा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. भाजपला भिती वाटत असल्यानं निवडणूका घेतल्या जात नाही आहेत. महागाई, बेरोजगारी असे प्रश्न मतदारसंघात आहे. पुणे, मुंबई, गोव्यात येथील मुलांना नोकरीच्या शोधात जावं लागतं आहे‌. आडाळी एमआयडीसीत एखादा प्रकल्प आला तर रोजगार मिळेल. त्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी  केली. तर इथली आरोग्याची सुविधा व्हेंटिलेटरवर आहे. पाणी प्रश्न, वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर होणारे हल्ले, नुकसान असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. इथल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. तो न्याय राष्ट्रवादी पक्ष देऊ शकेल. कोकणात बदल घडवायचा असेल तर तो शरद पवारच करू शकतात असं मत व्यक्त केल‌. तर सुप्रिया सुळे यांच्या आगमनानं पक्षात नवचैतन्य निर्माण झाल असून राष्ट्रवादीच वैभव पुन्हा मिळवून देऊ असा विश्वास अर्चना घारेंनी व्यक्त केला. 


याप्रसंगी खा. सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ नेते सुरेश दळवी, व्हिक्टर डॉंन्टस, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, निरीक्षक शेखर माने, नम्रता कुबल, रेवती राणे, प्रसाद रेगे, संदीप गवस, सावली पाटकर,प्रदीप चांदेलकर, महादेव देसाई, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, गौतम महाले, पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते