राष्ट्रवादी सोशल मीडिया फ्रंटल महाराष्ट्र प्रदेश कोकण विभागीय अध्यक्षपदी प्रा.सचिन पाटकर

Edited by: विनायक गावस
Published on: September 20, 2023 13:44 PM
views 141  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया फ्रंट विभागातर्फे सोशल मीडियाचे एक दिवसीय शिबिर 20 ऑगस्ट 2023 ला घेण्यात आले होते या शिबिरादरम्यान पक्षाध्यक्ष शरद पवार , प्रांताध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, युवा नेते रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  मेळाव्या दरम्यान मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीचे सोशल मीडिया  जिल्हाध्यक्ष प्रा.सचिन पाटकर यांनी मागील काळात केलेल्या सोशल मीडियाच्या कामाची दखल घेता महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष महादेव बालगुडे व कार्याध्यक्ष मोहसीन शेख यांनी कोकण विभागीय अध्यक्ष पदाची जबाबदारी प्रा. पाटकर यांना देण्यात आली.

      सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीचे तडफदार नेतृत्व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली चार जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोकण विभागाचे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली हे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.राज्यसमन्वयक महाराष्ट्र प्रदेश सुहास उभे ,ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस तेजस फणसे, सोशल मीडियाचे पदाधिकारी अनिल पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात प्रा.पाटकर कार्यरत असून यापुढील काळात संपूर्ण कोकण बरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोशल मीडिया करिता भरीव कामगिरी करून पक्षाला बळकटी देण्याचे कार्य सदैव करत राहू असं मत व्यक्त केले.