सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राष्ट्रवादी नेते प्रविण भोसले, अर्चना घारेंनी दिली भेट

Edited by: विनायक गावस
Published on: September 29, 2023 13:02 PM
views 137  views

सावंतवाडी : शहरातील चितारआळी येथे गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास माजी राज्यमंत्री प्रविण भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे यांनी भेट दिली. यावेळी गणरायाचे आशीर्वाद त्यांनी घेतले.आपल्या कोकणची ओळख असणारा गणेशोत्सव अधिकाधिक कलात्मक व परंपरा जपणारा आहे. अत्यंत उत्सव प्रेमी असणारे मंडळाचे पदाधिकारी हा उत्सव यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात असं मत घारेंनी व्यक्त केलं.

या भेटीदरम्यान प्रविण भोसले आणि अर्चना घारे यांनी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीसाठी मंडळाचे अध्यक्ष अशोक गुप्ता, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, मोरेश्वर पोतनीस, राकेश नेवगी, हिदायतुल्ला खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.