राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग प्रदेश महासचिव शफिक खान यांचा सत्कार

प्रदेश चिटणीस सुरेश गवस यांच्या हस्ते झाला सत्कार
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 29, 2022 19:06 PM
views 185  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग प्रदेश महासचिव शफिक खान यांची पदावर नियुक्ती करण्यात आल्याबद्दल प्रदेश चिटणीस सुरेश गवस यांनी व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग राष्ट्रीय सचिव आसिफ ख्वाजा, उदय भोसले प्रांतीक सदस्य, एम डी सावंत जिल्हा उपाध्यक्ष, सत्यजित धारणकर -देशमुख, माजी शहराध्यक्ष श्रीमती रंजना निर्मल, महिला जिल्हा सदस्य, गुरुदत्त कामत, शहर सरचिटणीस, अर्शद बेग, युवक तालुकाध्यक्ष, कैस शहा, गौस मुल्ला आदी उपस्थित होते.