
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील राष्ट्रीय जलतरणपट्टू पूर्वा संदीप गावडे हिची मुलाखत सोमवार दिनांक २४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता सिंधुदुर्गनगरी आकाशवाणी केंद्रावर प्रसारीत केली जाणार आहे.
सिंधुदुर्गनगरी आकाशवाणी केंद्राचे प्रतिनिधी निलेश कारेकर यांनी जलतरणपट्टू पूर्वा गावडे हिची मुलाखत घेतली आहे. या मुलाखती मध्ये जलतरण मधील प्राथमिक शालेय स्तरापासून राष्ट्रीय स्तरा पर्यतचा प्रवास त्यांनी उलघडला आहे. बारावीची नुकतीच परीक्षा दिलेल्या पूर्वाने पाच वर्षाची असल्यापासून तिने जलतरणचा प्रवास सुरु करून तिने आतापर्यत जिल्हा स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यत ५० हून जास्त मेडल मिळविली आहेत. तिने जलतरण मधील यशाचा हा प्रवास मुलाखती मधून उलगडला आहे.