
वैभववाडी : ग्रामसेवा क्रीडा मंडळ उंबर्डे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेली १५ वी भव्य राष्ट्रीय शुटींग बाॕल स्पर्धा सोमवार दिनांक ४ वैभववाडीत होत आहे. शहरातील दत्त मंदिरनजीक मैदानावर दिवसरात्र स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत राज्यातील नामांकीत संघासह उत्तरप्रदेश, खली पंजाब, मध्यप्रदेश हे संघ सहभागी होणार आहेत.
गेली १४वर्षे दरवर्षी होणारी राष्ट्रीय शुटींगबॉल स्पर्धा उद्या वैभववाडीत होत आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक १५.हजार रुपये , द्वितीय १० हजार, तृतीय व चतुर्थ स ५ हजार, पाच ते आठ क्रमांक येणाऱ्या प्रत्येक संघास २ हजार रुपये व सर्वांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे इतर आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
सोमवारी सकाळी १० वा. या स्पर्धेचे उद्दघाटन जिल्हा बॕंकेचे संचालक दिलीप रावराणे व माजी सभापती अरविंद रावराणे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्राम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष शेरपुद्दीन बोबडे, तर प्रमुख उपस्थिती आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर उपस्थिती राहाणार आहेत. त्याचप्रमाणे तहसिलदार सुर्यकांत पाटील, पोलिस निरीक्षक सुनिल अवसरमोल,नगराध्यक्षा नेहा माईणकर, बिल्डर दत्ता काटे, भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, उदयोजक सुनिल नारकर, संदीप सरवणकर, संजय सावंत, जयेंद्र रावराणे, सुधीर नकाशे, मौलाना मौलवी, विजय तावडे, भालचंद्र साठे, हुसेन लांजेकर , गुलाबराव चव्हाण, शरद नारकर, संजय कदम आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. या स्पर्धेचा आनंद क्रीडाप्रेमींनी घ्यावा. असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष शेरपुद्दीन बोबडे, कार्याध्यक्ष अॕड महेश रावराणे , सचिव डाॕ.विजय पांचाळ यांनी केले आहे.