
दोडामार्ग : झोळंबे प्रशालेचे आदर्श शिक्षक संतोष ज्ञानेश्वर गवस शाळा यांना राष्ट्रीय फिनिक्स स्टार गोल्ड ॲवार्ड २०२३ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बेळगाव येथील आधार सोशल फौंडेशन, बेळगाव या सेवा भावी संस्थेच्यावतीने गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातील प्रेरणादायी प्रेरक व्यक्तिमत्त्वांचा शोध घेऊन त्यांना राष्ट्रीय फिनिक्स स्टार गोल्ड ॲवार्ड २०२३ ने सन्मानित करण्यात आले. हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा ऑडिटोरिअम हॉल, पिंपरी चिंचवड, पुणे येथे नुकताच संपन्न झाला. आधार सोशल फौंडेशन ही संस्था गेली अनेक वर्षे निराधार तरुण तरुणींचा सामुदायिक विवाह सोहळा, रक्तदान शिबीरे, पुरग्रस्तांसाठी आर्थिक सहाय्य, आरोग्य शिबीरे, एड्सग्रस्त मुलांचे पालकत्त्व अशा समाजातील विविध प्रश्नांवर सेवाभावी वृत्तीने काम करीत आहे. त्याचबरोबर समाजातील विविध क्षेत्रातील प्रेरक व्यक्तिमत्वांचा शोध घेऊन त्यांना सन्मानीत करण्याचे काम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्यात राष्ट्रीय आदर्श शिक्षक प्रेरणा गौरव पुरस्काराने सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जि. प. आदर्श शिक्षक संतोष ज्ञानेश्वर गवस यांना सन्मानीत करण्यात आले. गेली २० वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत असताना केलेल्या शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा ॲवार्ड देऊन गौरवण्यात आल.
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या मानस कन्या डॉ. सुनिता ताई मोडक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पुणे येथील निवृत्त जिल्हा न्यायाधिश श्री रविंद्र कुलकर्णी यांसह व्यासपिठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे , कल्याणी बहुउद्देशिय संस्थेच्या संचालिका कल्याणी कुलकर्णी (मोडक) , प्रसिद्ध वक्ते प्रकाश कदम, डॉ वाल्मिक वाघ, डॉ . काळूराम मलगुंडे, धोंडीबा कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.