भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या कु.आराध्या मुंडयेला 'राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान' पुरस्कार जाहीर

Edited by:
Published on: January 28, 2025 19:48 PM
views 163  views

सावंतवाडी : हिंदी विकास संस्था, नवी दिल्ली मार्फत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाड परीक्षेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या पाचवीतील कु.आराध्या मुंडये हिला 'राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान' पुरस्कार व सुवर्णपदक जाहीर झाले आहे.

या परीक्षेला देशभरातून लाखो विद्यार्थी बसले होते. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत कु.आराध्या हिने उल्लेखनीय यश मिळवले. स्कूलच्या हिंदी विषयाच्या शिक्षिका महादेवी मालगर यांचे मार्गदर्शन तिला मिळाले. हा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार, दि.३० जानेवारी २०२५ रोजी पंतप्रधान संग्रहालय, नवी दिल्ली येथील तीन मूर्ती भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.

आराध्याच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी तिचे अभिनंदन केले व वितरण सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या.