नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगिवेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 27, 2023 15:46 PM
views 112  views

कणकवली : आदर्श एज्युकेशन  सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगिवे येथे  राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन प्रवास व कार्या विषयी सोनाली पाटील यांनी माहिती दिली.

या निमित्ताने विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तीमत्वचा जवळून परिचय झाला.  तसेच  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांकडून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी राजेंद्र ब्रम्हदंडे,मोहन कावळे,परवेझ पटेल व पराग शंकरदास यांच्यासह शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.