
कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीअम स्कूल नडगिवे येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई, यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
शालेय परिपाठाच्या वेळी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेचे क्रीडा शिक्षक सुयोग राजापकर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा दिनाचे महत्त्व विशद करुन मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अमोल चौगुले यांनी विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.