राष्ट्रीय - राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या स्नेहमेळावा उत्साहात

Edited by:
Published on: May 05, 2025 19:39 PM
views 31  views

बांदा  : राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्ग यांचा वार्षिक स्नेहमेळावा मालवण येथील  रघुनाथ देसाई विद्यालयाच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय व राज्य पुरस्कार सिंधुदुर्ग  जिल्हा शाखेचे अध्यक्ष शिवराज सावंत यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर, राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दिक्षित आदि मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर व सिंधुदुर्ग  जिल्हाध्यक्ष शिवराज सावंत यांचा सेवानिवृत्तीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाखेच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन  सन्मान करण्यात आला.

चालू वर्षी महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राथमिक विभागातून  जे .डी. पाटील तसेच माध्यमिक विभागातून आनंद बामणीकर यांना प्राप्त झाल्याबद्दल जिल्हा शाखेच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन  सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे, प्रकाश घोगळे, प्रकाश सावंत, संजीव राऊत, विठ्ठल कदम,संजय रासम, रावजी परब ,स्नेहलता राणे,संदीप शिंदे आदिंचा घटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीचे अभिनंदन करून राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.यावेळी  राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध  मागण्या विषयी विचार विनिमय करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहलता राणे यांनी केले सुत्र संचालन संदीप शिंदे तर दशरथ शिंगारे यांनी मानले.