
मालवण : शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रिय मंत्री खासदार नारायण राणे झंझावती प्रचार सुरु केला आहे. आज वराड, काळसे, आंबेरी गावात गावभेट दौरा करत ग्रामस्थांशी संवाद साधला.
कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारासाठी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते घरोघर प्रचार करत आहेत. खासदार नारायण राणे यांनीही गावभेट दौऱ्याला सुरुवात केली आहे. लोकांचे प्रश्न समजून घेत त्यांच्याशी संवाद साधत आहेत. काल आंगणेवाडी, चाफेखोल, पोईप, गावचा दौरा केल्यानंतर आज मालवण तालुक्यातील वराड, काळसे, आंबेरी गावात दौरे करत ग्रामस्थांशी संवाद साधला.