मरीन पार्क होऊ दिल नाही, तर सिडकोचं काय घेऊन बसलात ?

एक इंचही जागा सिडकोला घेऊ देणार नाही : नारायण राणे
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 05, 2024 06:57 AM
views 117  views

कणकवली : मासेमारीवर परिणाम होईल म्हणून जपान सरकारचं मरीन पार्क होऊ दिल नाही. तर सिडकोचं काय घेऊन बसलात ? कोकणातल्या कोणत्याही किनारपट्टीवरील एक इंचही जागा सिडकोला खरेदी किंवा संपादीत करू देणार नाही. असा इशाराच केंद्रीयमंत्री तथा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी कणकवली येथील जाहीर सभेत दिला. कोकण किनारपट्टीवरील जागा सिडको ताब्यात घेऊन विकसित करणार असे सोशल मीडियावर चर्चा आणि पत्र व्हायरल होत होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.