राणेंविरूद्ध दोन विनायक राऊत !

Edited by: विनायक गांवस
Published on: April 24, 2024 11:22 AM
views 245  views

सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राणे विरूद्ध ठाकरे संघर्ष पहायला मिळत असून केंद्रीय मंत्री नारायण राणे विरूद्ध खासदार विनायक राऊत यांच्यात थेट लढत होणार आहे. राणे-राऊत लढतीत बाजी कोण मारणार हे औत्सुक्याच आहे. या लोकसभेसाठी तब्बल एकूण ९ उमेदवार रिंगणात असून विनायक राऊत आणि विनायक लवु राऊत (अपक्ष) असे दोन विनायक राऊत निवडून रिंगणात आहेत. त्यामुळे राणेंचा सामना दोन विनायक राऊतांशी होणार आहे‌.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी एकूण ९ उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या थेट लढत होणार आहे. यात 'अपक्ष' उमेदवारी अर्ज विनायक लवू राऊत नावाच्या व्यक्तीने दाखल केल्यानं दोन विनायक राऊत निवडून रिंगणात आहेत.

विनायक लवु राऊत (अपक्ष) यांची 'चिमणी' ही निशाणी आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देखील हे विनायक राऊत निवडणूक रिंगणात होते. त्यांनी ४३९३ मत घेतली होती. विद्यमान खासदार विनायक राऊत हे त्यावेळी 'धनुष्यबाण' चिन्हावर विजयी झाले होते. महाराष्ट्रातील राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर यंदा मशाल चिन्हावर ते लढत आहे. इतक्या वर्षांत धनुष्यबाण चिन्ह मतपेटीवर नसणार असून यंदा भाजपची कमळ निशाणी दिसणार आहे. राणेंच्या विरोधात दोन विनायक राऊत रिंगणात असल्याने या लढतीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिले आहे.