नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद मिळेल ?

मनीष दळवी काय म्हणाले ?
Edited by: दिपेश परब
Published on: June 05, 2024 14:27 PM
views 253  views

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने नारायण राणेंना दिलेले प्रेम शब्दात तोलण्यासारखे नाही. जिल्हयातील जनता राणेंच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली. यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेले प्रामाणिक काम कधीही विसरता येणार नाही. त्यांच्यामुळेच कोकणात भाजपला हे निर्मळ यश मिळाले आहे. नारायण राणे हे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढे जाणारे नेतृत्व आहे. खासदार म्हणून ते आता जनतेतून निवडून गेले आहेत. केंद्रात त्यांना मानाचे मंत्रिपदही मिळेल. त्यांच्या नेतृत्वाचा लाभ जिल्ह्याला होणार आहे. या मतदार संघातील मतदारांना नारायण राणे यांना आजपर्यंत कधी थेट मतदान करता आलं नव्हतं या निवडणुकीत पाहिल्यांदाच ही संधी मिळाली होती. आणि नारायण राणे यांच्याबद्दल असलेलं प्रेम, जिव्हाळा या सर्वातून पाहायला मिळाला अशी प्रतिक्रिया जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी वेंगुर्ला येथे व्यक्त केली. 

     येथील भाजप कार्यालयात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी तथा माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, अॅड. सुषमा प्रभूखानोलकर, भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला आघाडी अध्यक्ष सुजाता पडवळ, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, मच्छीमार सेलचे दादा केळुसकर, वसंत तांडेल, साईप्रसाद नाईक, मनवेल फर्नांडिस, प्रशांत खानोलकर, प्रशांत आपटे, जयंत मोडकर, रमेश नार्वेकर, स्मिता दामले, श्रेया मयेकर, प्रार्थना हळदणकर, इशा मोंडकर, वृंदा गवंडळकर, रसिका मठकर, आकांक्षा परब, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष पपू परब तसेच रवींद्र शिरसाट, संतोष साळगावकर, तुषार साळगावकर, भूषण सारंग, महेश खानोलकर, किसन चव्हाण, दिलीप परब, कमलेश गावडे, सत्यविजय गावडे, वैभव होडावडेकर, रवींद्र घोड, प्रभाकर सावंत, ओंकार कामत, काशिनाथ धोंड, पुंडलिक हळदणकर, शेखर काणेकर, सुनील मठकर, रवींद्र शिरसाट आदी भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

    यावेळी बोलताना राजन तेली म्हणाले, ४५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्ग जिल्हयाला भाजपचा हक्काचा खासदार मिळाला आहे. नारायण राणे यांचा विजय कार्यकर्त्यांना बुस्टर आहे. आता पुढच्या सर्वच निवडणुका जिंकण्याची उर्मी निर्माण झाली आहे. हा उत्साह कायम ठेवूया. जिल्ह्यातील सर्वच सत्ताकेंद्रे भाजपच्या ताब्यात येतील यासाठी प्रयत्नशील राहूया. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपचा अधिकृत उमेदवार म्हणून निरंजन डावखरे यांच्या पाठिशी राहून त्यांनाही विजयी करूया, असे आवाहन यावेळी बोलताना राजन तेली यांनी यावेळी केले.

      प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. त्यानंतर नारायण राणे यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. 'नारायण राणे तूम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, रवींद्र चव्हाण आगे बढो, हम तुम्हारे साथ है', अशा घोषणा देत फटाक्यांच्या आतषबाजीत व पेढे भरवून विजयी जल्लोष करण्यात आला.

सावंतवाडी मतदार संघातून नारायण राणे यांना मोठं मताधिक्य मिळेल असा आम्हाला सर्वच कार्यकर्त्यांना सुरुवातीपासूनच विश्वास होता. वेंगुर्ला तालुक्याने सुद्धा सुमारे १० हजारच्या आसपास मताधिक्य दिलं आहे. त्यामुळे सर्व मतदार कार्यकर्ते पदाधिकारी यांचा मी ऋणी असल्याचेही यावेळी मनिष दळवी म्हणाले.