मातोश्रीच्या कितव्या माळ्यावर किती खोके दिले हे तारीखनुसार जाहीर करेन

नारायण राणेंचा ठाकरेंवर जोरदार प्रहार
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 26, 2023 18:55 PM
views 143  views

राजापूर : मोदी @9 अंतर्गत भाजपाचे महाजनसंपर्क अभियान // राजापूरात भाजपाचे शक्तीप्रदर्शन // केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे भाषण // भाजपा एकसंघ आहे // लोकसभेचा उमेदवार निवडून देणार म्हणजे देणार // राणेंनी केला निर्धार // 9 वर्षात भारत प्रगतशील देश म्हणून आला नावारुपाला // आज जगामध्ये देश पाचव्या क्रमांकावर आहे // नरेंद्र मोदी 18 तास करतायत काम // जनतेपर्यंत पोहोचा // समोरील उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करा // विनायक राऊत दहावी नापास // आणि देशाचे पंतप्रधान, भाजपवर बोलतो // मातोश्रीच्या अंतर्गत सर्व गोष्टी माहिती आहेत // मी सांगणार नाही // पण हा उद्धव ठाकरे केव्हा तरी सांगायला लावणार // नारायण राणेंचा सूचक इशारा // पाटण्यात विरोधी पक्ष एकत्र आले // बैठकीला हातात पाच खासदार असलेले उद्धव ठाकरे होते // त्यांना वाटले होते आपले स्वागत करतील // बाळासाहेब ठाकरे कधी अशा बैठकांना गेले नाहीत // सोनिया गांधींकडे गेले नाहीत // सर्व नेते मातोश्रीवर यायचे // स्वतःचे कपडे कुठचे घालावे हे कळत नाही तो नेता कसा होणार ?// राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला // अडीच वर्षे मुख्यमंत्री होते // फक्त दोन दिवस मंत्रालयात आले // आदित्य ठाकरेंचा पिल्लू असा उल्लेख // त्याचे प्रताप बाहेर काढणार // सुशांतसिंग राजपूत, दिशा सालियानचा खूनच झाला // रमेश मोरे, जया जाधव यांची हत्या कशी झाली ?// अडीच वर्षात कोकणाला काय दिल ?// कोकणासाठी योगदान काय ?// कोकणाला काय दिले नाही तर मते का मागता ?// उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली आहे // रिफायनरी प्रकल्प येतोय // त्यातून रोजगार, हॉस्पिटल, कॉलेज उपलब्ध होणार // लोकांचं उत्पन्न वाढले पाहिजे // राजन साळवींना घेऊन काय उपयोग ?// त्याच्या तोंडावरची मासकी नाही हलत // संजय राऊत राज्यसभेत भेटतो काय बघतो // हल्ली सभागृहात येतच नाही // संजय राऊत थोडेच दिवस बाहेर // उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सुद्धा दिसणार नाही //  ठाकरे गटातील अनेक आपल्या संपर्कात // संजय राऊत मुख्यमंत्रिपदावर होते डोळा ठेऊन // एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन हॉटेलच भाडे भरत होते // आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले // शिवसैनिक राहिले बाजूला // उद्धव ठाकरे कपटी आणि कारस्थानी माणूस // मातोश्रीच्या कितव्या माळ्यावर किती खोके दिले हे तारीखनुसार जाहीर करेन // जनता सुखी समाधानी राहावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसरात्र काम करत आहेत // केंद्रात आणि राज्यात सत्ता आणणे काळाची गरज // नारायण राणे //