नारायण राणे यांना महायुतीची उमेदवारी !

वैभववाडीत भाजपाचा जल्लोष
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 18, 2024 06:26 AM
views 338  views

वैभववाडी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेकरिता महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाची घोषणा झाली. यानंतर वैभववाडी तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मोठा जल्लोष केला. भाजपा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आनंद व्यक्त केला.

गेल्या कित्येक दिवसांपासून लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेकरिता अखेर महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाची घोषणा झाली. भाजपच्या १३व्या यादीत श्री राणे यांच नाव जाहीर झालं. या नावाची घोषणा झाल्यानंतर वैभववाडीत भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. राणे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं, अब की बार ४००पार आदी घोषणा देत फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

यावेळी उपजिल्हा अध्यक्ष भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, प्राची तावडे, नेहा माईंणकर, नवलराज काळे, बंड्या मांजरेकर, स्वप्निल खानविलकर, हुसेन लांजेकर, रोहन रावराणे, राजू पवार ,सुंदराबाई निकम, यामिनी वळवी, मारुती मोहीते,अवधूत नारकर ,संजय चव्हाण, रत्नाकर कदम, संतोष पवार, श्रेयस नेवरेकर, आदित्य चव्हाण, प्रदीप नारकर, अनंत फोंडके, उदय पांचाळ यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.