
सिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री - खासदार नारायण राणे यांच्या ७३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ओरोस शरद कृषी भवन मध्ये भव्य दिव्य असा 'खास दिवस खासदारांचा' हा विशेष वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा सायंकाळी संपन्न होतोय. खासदार व उत्सवमूर्ती नारायण राणे यांच्या हस्ते या कार्यक्रमचा शानदार शुभारंभ झाला.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे, माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, नीलमताई राणे, प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर, आयपीएस अधिकारी समीर वानखेडे, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, संजू परब, संजय आंग्रे, काका कुडाळकर, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, कार्यक्रम आयोजक मनीष दळवी, जिल्हा बँक अध्यक्ष व्हिक्टर डांट्स, संदीप कुडतरकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. त्याचे बक्षीस वितरण आज खासदार नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.