मेस्त्री कुटुंबियांचे नारायण राणेंनी केलं सांत्वन

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 17, 2024 14:28 PM
views 115  views

कणकवली : भारतीय जनता पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री व युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. 

माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे, नीलमताई राणे व आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. सोबत डॉ.मिलिंद कुलकर्णी व अन्य मान्यवर उपस्थित होते.