कसाल सरपंचांनी घेतली नारायण राणेंची भेट

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 17, 2024 11:49 AM
views 382  views

सिंधुदुर्गनगरी :  कसाल सरपंच राजन परब यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांची भेट घेत पुष्पगुच्छ देवून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

     माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांना कुडाळ तालुक्यातील कसाल गावातून निवडणुकीत मिळालेले मोठे मताधिक्य हे भाजपच्या कार्यकर्त्यांनी -पदाधिकाऱ्यांनी प्रचार, व मेहनत घेऊन केलेल्या कामांची पोच आहे आम्ही कायमच राणे यांच्या सोबत आहोत असे सरपंच राजन परब यांनी मत व्यक्त केले .

      रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आज कसाल भाजप कार्यकर्त्यांसह सरपंच राजन परब यांनी पडवे येथील  एस,एस,पी,एम, मेडिकल येथे जाऊन भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच शंकर परब ग्रा ,पं. सदस्य चिन्मय पावसकर, सामाजिक कार्यकर्ते बापू पाताडे, अवधूत निगुडकर, चांगदेव मिठबावकर, बांदेकर, आदींसह  भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.