
मालवण : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत लक्षवेधी विजय मिळवल्यानंतर मालवण दौऱ्यावर आलेल्या माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांचे मालवणात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी सौ. निलमताई राणे याही उपस्थित होत्या.
कुंभारमाठ येथे ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी यावेळी करण्यात आली. कुंभारमाठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला खा. नारायण राणे यांनी पुष्पहार अर्पण करत पूजन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजप पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मालवण येथील निलरत्न निवासस्थानी खा. नारायण राणे दाखल होताच व्यापारी, डॉक्टर तसेच अन्य नगरिक यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. शिवसेना (शिंदे) यांच्या पदाधिकारी यांनीही उपस्थित राहात खा. नारायण राणे यांचे स्वागत केले.