
सावंतवाडी : शिवतेज मित्रमंडळ गेली अनेक वर्षे सावंतवाडी शहरात नरकासुर स्पर्धा आयोजित करत असून यंदा हे स्पर्धेचे ६ वे वर्ष आहे. आज रात्री ठिक 7 वाजल्यापासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून मोती तलावाच्या काठावर श्रीराम वाचन मंदीर सावंतवाडी ग्रंथालयाच्या समोरील जागेत भव्य दिव्य अश्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी सर्व स्पर्धकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.