
कणकवली: दिवाळीच्या निमित्ताने कलमठ बाजारपेठ येथे संदीप मेस्त्री मित्रमंडळातर्फे रविवार, १९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता गाव मर्यादित नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी चार हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी तीन हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये आणि उत्तेजनार्थ एक हजार रुपये, अशी रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह दिले जाणार आहेत.
स्पर्धेतील नरकासुरासोबत श्रीकृष्ण वेशभूषा केलेले पात्र असणे बंधनकारक आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे नोंदवणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी तेजस लोकरे (९४२२१७९५९६) किंवा नितीन पवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संदीप मेस्त्री मित्रमंडळाने केले आहे.










