
सावंतवाडी : शहरातील सुप्रसिद्ध बांदेकर मेडिकल स्टोअर्सचे मालक विद्यानंद अशोक तथा नंदू बांदेकर (५१, सालईवाडा, सावंतवाडी) यांचे निधन झाले. शुक्रवारी रात्री प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना उपचारार्थ गोवा बांबूळी रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यातच उपचारा दरम्यान शनिवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे ते सक्रीय सभासद होते. सदैव हसत खेळत स्वभाव व मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यामुळे त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा भाऊ बहीण असा परिवार आहे. विशाल बांदेकर यांचे ते भाऊ तर कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे ते भावोजी होत.