
कणकवली : जानवली दळवीवाडी येथील श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव शुक्रवार, १६ जानेवारी रोजी श्री भवानी देवी मंदिर येथे विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
यानिमित्त सकाळी ७ वा. पासून महाआरती, चौंडेश्वरी, वाद्य पूजन, नवस पूर्तता, सायं. ५.३० वा. जोगवा, ७.३० वा. मांड पूजन, वाघ्याचा साखळी-लंगर तोडण्याचा कार्यक्रम, रात्री ८.३० वा. महाप्रसाद, ९.०० वा. देवीच्या मांडाची ओटी, नवस, १० वा. देवीचा गोंधळ-कथा कथन जागर, पहाटे ४ वा. पासून नामावळी, देवीची काकड आरती, ५ वा भाविकांची गाऱ्हाणी, नवस असे कार्यक्रम होणार आहेत. गोंधळ उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जानवली – दळवीवाडी येथील श्री भवानी देवी मंदिर उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.










