
वेंगुर्ले : शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांचे राज्यातील लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशाबद्दल प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रदेश उपाध्यक्ष नम्रता कुबल यांनी मुंबई येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, या भेटीत नम्रता कुबल यांनी वेंगुर्ला शहरातील १५० वर्षे पूर्ण झालेल्या जिल्हापरिषद प्राथमिक शाळा राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेला लॅपटॉप व झेरॉक्स प्रिंटर मिळण्याबाबत शरद पवार यांच्याकडे मागणी केली आहे. तशाप्रकारचे निवेदन त्यांनी शरद पवार यांना सादर केले. यावेळी पक्षाचे जिल्हा सदस्य नितीन कुबल उपस्थित होते.