
दोडामार्ग : कोनाळ गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी पुन्हा एकदा नामदेव तुकाराम गवस यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नामदेव गवस यांची निवड झाल्याबद्दल कोनाळ सरपंच अस्मिता अनिल गवस, उपसरपंच रत्नकांत कर्पे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रितम पोकळे, ग्रामसेवक खानोलकर ग्रामस्थ अनंत आरोलकर, रामा ठाकर, दीपक गवस, केशव पोकळे,अनिल गवस,सुभाष लोंढे,ऋतुजा देसाई, कर्मचारी गोपाळ ठाकर, चंद्रकांत लोंढे खालिल ग्रामस्थ उपस्थित होते. गवस यांची निवड झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.