नॅब चिपळूणची कार्यकारिणी जाहीर

निलेश भुरण अध्यक्षपदी
Edited by: मनोज पवार
Published on: August 09, 2025 20:14 PM
views 18  views

चिपळूण : नॅब चिपळूण जिल्हा शाखा रत्नागिरीच्या २०२५ ते २०३० या कालावधीसाठीची नवीन कार्यकारिणी नुकत्याच झालेल्या सभेत जाहीर करण्यात आली. यामध्ये नुतन अध्यक्षपदी संस्थेचे कार्यवाह निलेश भुरण यांची निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे — उपाध्यक्ष : इब्राहीम दलवाई, सितश विरकर; सेक्रेटरी : भरत नांदगावकर; सहसेक्रेटरी : प्रकाश पाथरे; खजिनदार : नयन साडविलकर; सहखजिनदार : सौ. राधिका पाथरे; संचालक : अॅड. विवेक रेळेकर, कौस्तुभ खरे, सौ. सोनाली खर्चे, अॅड. ऋषिकेश थरवळ.

मावळते अध्यक्ष सुचय उर्फ अण्णा रेडीज यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा सल्ला दिला.

निलेश भुरण हे संस्थेच्या स्थापनेपासून कार्यरत असून २००४-०८ या कालावधीत सहखजिनदार, २०१०-१५ मध्ये संचालक, २०१५-२० मध्ये सहखजिनदार, तर २०१९ मध्ये उपाध्यक्ष आणि २०२०-२५ या कालावधीत सेक्रेटरी म्हणून काम केले आहे. तसेच ते चिपळूण अर्बन को-ऑप. बँक आणि नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे संचालक आहेत. अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी संचालक मंडळाच्या सहकार्याने संस्थेचे कार्य अधिक गतीने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रसंगी मावळते अध्यक्ष रेडीज, अंबरीश उर्फ दादा खातू आणि सुचेता लाड यांचा निलेश भुरण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित अध्यक्षांचा संचालक मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.