म्युझिकल फाऊंटन'ची पाहणी !

पर्यटन क्षेत्रात सावंतवाडी आकर्षक ठरेल : दीपक केसरकर
Edited by: विनायक गावस
Published on: May 29, 2025 21:44 PM
views 128  views

सावंतवाडी : ऐतिहासिक मोती तलाव येथे सुरु होत असलेल्या 'म्युझिकल फाऊंटन'ची पहाणी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी केली. या संगीत कारंजाच्या मनमोहक नजराण्याचा आनंद त्यांनी यावेळी घेतला. लवकरच हा कारंजा सुरू करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात हे शहर पर्यटन क्षेत्रातील आकर्षण ठरेल असा विश्वास श्री. केसरकर यांनी याप्रसंगी व्यक्त केला‌. 


ते म्हणाले, साडेचार कोटींचा हा कारंजा असून याच्या ट्रायल्स सुरू आहेत. त्या यशस्वी झाल्यानंतर हा संगीत कारंजा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सावंतवाडी हे पर्यटनाचं आकर्षण केंद्र ठरले पाहिजे. मोती तलाव हा याचा मुख्य आकर्षण बिंदू आहे. त्यादृष्टीने या कारंजासह बोटींग, तलावकाठी खाऊगल्ली, योगा सेंटर आदीही प्रकल्प सुरू होणार आहेत. ऐतिहासिक राजवाडा, लाकडी खेळणी, हेल्थ पार्क, शिल्पग्राम आदी गोष्टी इथे आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पर्यटन क्षेत्रात हे शहर आकर्षण ठरेल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी प्रसाद महाले, प्रतिक बांदेकर, नंदू शिरोडकर, शैलैश मेस्त्री, सचिन मोरजकर आदी उपस्थित होते.