
सावंतवाडी : पर्यटन नगरी सावंतवाडीच्या सौंदर्यात भर टाकणारा साडेतीन कोटींचा संगीत कारंजा अखेर पूर्णत्वास आला आहे. येत्या आठवड्यात याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील हा एकमेव असा 'म्युझिकल फाऊंटन' ठरणार असून पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून हा कारंजा साकारण्यात आला आहे.
ऐतिहासिक मोती तलावात हा संगीत कारंजा सुरू करण्यात येत आहे. पर्यटन नगरी सावंतवाडीच्या सौंदर्यात यामुळे अधिक भर पडणार आहे. माजी मंत्री आम. दीपक केसरकर यांच्या संकल्पेतून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. या संगीत कारंजा पूर्णत्वास आला असुन येत्या आठवड्यात त्याच शुभारंभ होणार आहे. याचा फायदा पर्यटनाला होणार असून पुढिल पाच वर्ष संबंधित कंपनी या कारंज्याची देखभाल दुरुस्ती राखणार आहे अशी माहिती उपस्थित तंत्रज्ञांनी दिली.