मुणगेला मोबाईल टॉवर मंजूर !

सरपंचांनी मानले नितेश राणेंचे आभार
Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 21, 2023 19:39 PM
views 117  views

देवगड :  मुणगे गावातील आपईवाडी आणि आडवळवाडी साठी मोबाइल रेंज समस्या असल्याने या भागासाठी बीएसएनएल मोबाइल टॉवर मंजुरी तसेच श्री भगवती देवालय नजीक मोबाइल टॉवरच्या बॅटऱ्या नवीन बसविण्याची कार्यवाही आमदार नितेश राणे यांच्या आदेशाने पूर्ण झाल्या बद्दल मुणगे सरपंच सौ साक्षी गुरव, भाजप नेते गोविंद सावंत यांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेत आभार मानले.

मुणगे गावाची रचना डोंगराळ भागाची असल्याने मुणगे गावातील काही वाडीतील ग्रामस्थ नेटवर्क पासून वंचित होते. सदर बाब आमदार नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिल्या नंतर मतदारसंघातील बि एस एन एल नेटवर्क संबंधी कोल्हापूर व गोवा येथील बि एस एन एल च्या अधिकारी यांच्या बैठकीत सदर समस्या तातडीने दूर करण्याचे त्यांनी सूचित केले होते. श्री भगवती देवालय नजीक बि एस एन एल टाॅवर लाईट गेली कि लगेच बंद होत होता. त्या ठिकाणी तात्काळ नवीन बॅटरी बि एस एन एल चे उपमंडल अभियंता श्री कैलास पायमोडे, बळवंत कांबळे यांनी तातडीने जोडून दिली. तसेच आडवळवाडी व आपईवाडी येथे मिनी टाॅवर उभारणीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत अशी माहिती गोविंद सावंत यांनी दिली.

मोबाइल टॉवर जागा निश्चिती पाहणी वेळी आडवळवाडी व आपईवाडी वाडी येथे सरपंच सौ साक्षी गुरव,उपसरपंच श्री संजय घाडी, दत्ता बांबरडेकर, भाजप नेते गोविंद सावंत, अजित रासम, चंद्रकांत रासम, अरूण रासम, बबन रासम, सहदेव रासम, विजय पडवळ, अशोक सावंत, बंडू आचरेकर, अशोक मुणगेकर यश मुणगेकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.