मत्स्य उत्पादनात राज्याला अग्रस्थानी आणणार : मंत्री नितेश राणे

Edited by:
Published on: October 27, 2025 17:35 PM
views 108  views

मुंबई : राज्याने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे. याबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, मच्छीमारांना आर्थिक सहाय्य देणाऱ्या योजना, मच्छिमार बंदरांचा विकास यामुळे मत्स्य उत्पादनात 47% वाढ झाली आहे. मागील अकरा महिन्यांच्या कालावधीत राज्य शासनाने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले असून विभागाच्या माध्यमातून मच्छीमारांसाठी विविध 26 योजना लागू करण्यात येत आहेत. यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी व समुद्रातील मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या जीवनामध्ये  आर्थिक समृद्धी निर्माण होईल.

पुढील काळात केंद्र शासनाच्या सहकार्याने व सहकार विभागाच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय क्षेत्रात क्रांती आणणार असल्याचेही मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले. मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, केंद्रीय मत्स्यव्यवसाय सचिव अभिलाष लेखी, केंद्रीय सहकार सचिव आशिष कुमार भुतानी, राज्याचे सहकार विभागांचे प्रधान सचिव प्रविण दराडे आदी यावेळी उपस्थित होते. भुतानी यांनी प्रास्ताविक केले तर सचिव रामास्वामी यांनी आभार मानले.