
कणकवली : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबई येथील अधिश निवासस्थानी जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. नारायण राणे यांना काही दिवसांपूर्वी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राणे बरे होऊन रुग्णालयातून घरी अधिश निवासस्थानी परतल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी अधिश निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.










