वैभव नाईक, परशुराम उपरकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: July 27, 2025 19:13 PM
views 998  views

कणकवली : माजी आमदार वैभव नाईक व माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी उबाठा शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नाईक, उपरकर यांच्यासह सिंधुदुर्गातील उबाठा शिवसैनिक हे पक्षवाढीसाठी प्रामाणिक मेहनत घेत आहेत, याबाबत उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. याप्रसंगी नाईक, उपरकर यांच्या समवेत सिंधुदुर्गातील उबाठा शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.