
मुंबई : मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय सहकारी विकास निगम, सहकारिता विभाग, भारत सरकार यांच्या सामूहिक प्रयत्नाने 'सहकारिता द्वारे मत्स्य समृद्धी' प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी नौकांचा उदघाटन सोहळा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडला.
मागील ११ महिन्यात महाराष्ट्र सरकारने मत्स्यखात्यासंबंधी क्रांतिकारी निर्णय घेतले. मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देऊन अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय व मत्स्य उत्पादन ४७ टक्क्याने संपूर्ण देशाच्या तुलनेत वाढ झालेली आहे. फिशिंग आणि एक्वा कल्चर व सहकारिता क्षेत्रात आर्थिक समृद्धी आणण्यासाठी आम्ही मार्गक्रमण करत यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ व इतर मंत्री तसेच अधिकारी उपस्थित होते.










