मुंबईतील ठाकरेंचं वर्चस्व मोडीत..?

Edited by:
Published on: November 24, 2024 19:04 PM
views 394  views

मुंबई : राज्यात महायुतीच्या दणदणीत विजयाप्रमाणेच मुंबईवरही भाजप व महायुतीनेच झेंडा रोवला आहे. मुंबईवर आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र, ते मोडीत काढून महायुतीला २२ तर भाजपला १५ जागांवर विजय मिळाल्याने भाजपने आता मुंबईही काबीज केली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशावर मात करून महायुतीने यश प्राप्त केले आहे.