सीओ सागर साळुंखेंंनी स्वीकारला पदभार ; ठरले ३० वे मुख्याधिकारी

Edited by: विनायक गांवस
Published on: May 19, 2023 17:26 PM
views 137  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून सागर साळुंखे यांनी पदभार स्वीकारला आहे. मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर साळुंखे यांनी पदभार स्वीकारला आहे. ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त म्हणून ते काम पाहत होते. १६ मे २०२३ रोजी सावंतवाडी मुख्याधिकारी म्हणून बदलीचे आदेश निर्गमित करण्यात आले. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सावंतवाडीतील आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवकांसह शहरातील नागरिकांनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. आपल्या कार्यकाळात विधायक काम करण्यावर भर राहणार असल्याचं मत मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी व्यक्त केले. ते सावंतवाडी नगरपरिषदेचे ३० वे मुख्याधिकारी ठरले आहेत. आतापर्यंत सावंतवाडी नगरपरिषदेत १७ नगराध्यक्ष व २९ मुख्याधिकारी यांनी कार्यभार सांभाळला आहे.