
सावंतवाडी : असनिये ग्रामपंचायतीचे अधिकारी मुकुंद गोविंद परब यांनी असनिये गावाच्या विकासासाठी सुमारे १० वर्षे तन मन धन अर्पण करून सर्वोत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल त्यांचा असनियेवासियांच्यावतीने सन्मान करण्यात आला.
गावचे ग्रामदैवत माऊली मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला असनिये ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ रेश्मा सावंत, देवस्थानचे मानकरी, राजाभाऊ भुस्कुटे, दाजी सावंत, प्रकाश सावंत, लक्ष्मण सावंत, दशावतारी कलाकार बाबल सावंत, भिकाजी नाईक, विश्वनाथ सावंत, उदय सावंत, शैलेश सावंत, पोलीस पाटील विनायक कोळापटे आदी मान्यवर उपस्थित होते. शांत, मनमिळावू हरहुन्नरी आणि विविध कलांमध्ये पारंगत अशी ओळख असलेले मुकुंद परब अष्टपैलू दशावतारी कलाकार व उत्कृष्ट सुत्रसंचालक आहेत. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुकुंद परब यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक मिलिंद निकम यांनी केले.