म.सा.प. चिपळूण शाखेची २७ जूनला सर्वसाधारण सभा

Edited by: मनोज पवार
Published on: June 12, 2025 13:13 PM
views 181  views

चिपळूण : महाराष्ट्र साहित्य परिषद (म.सा.प.) संस्थेच्या चिपळूण शाखेची सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक २७ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात होणार आहे.

या सभेत मागील वर्षातील कामांचा आढावा, खर्चाचा लेखाजोखा, पुढील वर्षी होणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन, वाचनसंस्कृती आणि सांस्कृतिक क्षेत्र वाढवण्याबाबतच्या उपाययोजनांवर चर्चा व कार्यवाही, वर्षभरात होणाऱ्या स्पर्धा व व्याख्याने यांचे नियोजन, विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ संपत आल्याने त्याबाबत निर्णय, अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या इतर विषयांवर यावेळी चर्चा आणि निर्णय होतील. या सभेस उपस्थित राहाण्याचे आवाहन शाखा अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, कार्याध्यक्ष सौ. अंजली बर्वे यांनी केले आहे.