बोडदे शाळेचा कु. अथर्व पाटील जिल्हा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत...!

Edited by: संदीप देसाई
Published on: July 15, 2023 12:07 PM
views 137  views

दोडामार्ग : सन २२ - २३ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जि. प. पू. प्रा. शाळा बोडदेचा विद्यार्थी क. अथर्व केशव पाटील हा सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता यादीत आला आहे. नेहमी शिष्यवृत्ती परीक्षा व अन्य शैक्षणिक उपक्रमात अग्रेसर असणार्‍या बोडदे शाळेच्या यशाची परपंरा कु. अथर्वने टिकवून शाळेचे व बोडदे गावाचे नाव लौकीकात भर टाकली आहे.

या यशाबद्दल त्याचे शाळा व्यवस्थापन अध्यक्षा सौ. साक्षी संदिप नाईक, उपाध्यक्षा सौ. रुपाली प्रविण गवस , फटी नार्वेकर ,रमेश दळवी, श्रीकृष्ण गवस, महेश पारधी, नारायण गवस , चंद्रकांत जाधव, सुनिल नाईक यांनी कौतुक केले आहे.

अथर्वला या यशप्राप्तीसाठी वर्गशिक्षिका श्रीम. पूनम खोराटे , माजी शिक्षक कै. सखाराम झोरे , समीर घाडी व मुख्याध्यापक  महेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. साटेली भेडशी केंद्राचे केंद्रप्रमुख  सुर्यकांत नाईक यांनीही अथर्व व प्रशालेच्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.