LIVE UPDATES

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षपदी सौ. सानिका मदने

सचिवपदी सौ. सई तेली, खजिनदारपदी सौ. गीतांजली कांदाळगावकर, आयएसओपदी सौ.मेघा भोगटे, एडिटर डाॅ. सौ. सायली प्रभू
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: July 09, 2025 18:00 PM
views 26  views

कुडाळ :  इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या नूतन अध्यक्षपदी सौ सानिका मदने, सचिवपदी सौ सई तेली, खजिनदार पदी सौ गीतांजली कांदळगावकर, आयएसओपदी सौ. मेघा भोगटे, एडिटर पदी पीडीसी डाॅ. सौ. सायली प्रभू यांची निवड झाली आहे. वार्षिक पदग्रहण समारंभ 13 जुलै रोजी सायंकाळी 4 वा महालक्ष्मी हाॅल कुडाळ येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नूतन अध्यक्ष सौ. सानिका मदने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

2025-26 या वर्षात इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ ची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.अध्यक्ष- सौ सानिका मदने ,सचिव - सौ सई तेली ,खजिनदार सौ गीतांजली कांदळगावकर, आयएसओ सौ मेघा भोगटे ,एडिटर पीडीसी डाॅ सौ सायली प्रभू, आयपीपी सौ संजना कानेकर,सीपीसी सौ पल्लवी बोभाटे, सीसीसीसी सौ शिल्पा बिले ,इसी सदस्य सौ ऋतुजा परब,सौ मानसी जोशी, सौ चित्रा बोभाटे, सौ पदमा वेंगुर्लेकर, सौ राजश्री सावंत, सौ मनाली नाईक.

वार्षिक पदग्रहण समारंभ 13 जुलै रोजी सायं 4 वा महालक्ष्मी हाॅल कुडाळ येथे आयोजित करण्यात आला असून प्रमुख पाहुण्या इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर च्या माजी अध्यक्ष सौ मनिषा संकपाळ उपस्थित राहणार आहेत. 

वर्षभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे अध्यक्षा सौ सानिका मदने व एडिटर पीडीसी सौ सायली प्रभू यांनी सांगितले. यामध्ये कुमारवयीन मुलींसाठी एमएचएम कार्यक्रम, वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,महिला कामगारांसाठी आरोग्य शिबीर, मुलींना सायकलवाटप, शिलाई मशिन्स वाटप,नशाबंदी उद्बोधन कार्यशाळा, इलर्निग कीट आदी उपक्रमांचा समावेश आहे.काही उपक्रम रोटरी क्लब ऑफ कुडाळ सोबत संयुक्तरित्या करण्याचा मानस अध्यक्षा सौ सानिका मदने यांनी व्यक्त केला.

कै. मेघा शिरसाट स्मृती पुरस्कार -  इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ च्या सदस्या कै. मेघा शिरसाट यांचे स्मृतिप्रीत्यर्थ स्वकर्तृत्वावर स्वावलंबी बनलेल्या सौ. स्मिता संतोष शिरसाट यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त एका महिलेचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.इनरव्हील सदस्यांच्या पाल्यांचाही शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. वार्षिक पदग्रहण समारंभात 15 शालेय गरजू विद्यार्थ्यांना इनरव्हील ब्रॅण्डच्या वह्या वाटप करण्यात येणार आहेत. 

इनरव्हीलची नवीन थीम- यावर्षातील इनरव्हील ची नवीन थीम स्टेपअप ॲन्ड लीड बाय एक्साम्पल अशी आहे. डिस्ट्रिक्ट 317 च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ उत्कर्षा पाटील यांची निवड करण्यात आली असल्याचे एडिटर पीडीसी डाॅ सायली प्रभू यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत उपस्थित रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे राजीव पवार, डाॅ संजय केसरे, सचिन मदने, राकेश म्हाडदळकर, रविंद्र परब, दिनेश आजगावकर, इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ सौ सानिका मदने सौ. डाॅ. सायली प्रभू,सौ. शिल्पा बिले उपस्थितीत होते.