राणीसाहेब शुभदादेवी भोंसलेंना मातृशोक

Edited by: विनायक गांवस
Published on: July 24, 2025 11:28 AM
views 119  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या मातोश्री श्रीमती मृणालिनीदेवी शिवाजीराव सावंत यांचे वयाच्या 89 व्या वर्षी बेंगलोर येथे निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे सर्व कार्यकारीणी सदस्य, श्री पंचम खेमराज महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

त्यांच्या पश्चात त्यांच्या तीन मुली राणीसाहेब सौ.शुभदादेवी खेमसावंत भोंसले, सौ.अनुराधा इंद्रजीत घोरपडे, सौ. प्रिया शैलेंद्र घोरपडे, जावई - राजेसाहेब  खेमसावंत भोंसले, श्री इंद्रजीत घोरपडे, श्री शैलेंद्र घोरपडे व नातवंडे असा परिवार आहे.