
दोडामार्ग : श्री गणराज सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळाच्या वतीने दीपावली महोत्सव २०२२ अंर्तगत विविध कार्यक्रमाचे भरगच्च आयोजन २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले होते.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सदानंद धरणे, गोपाळ गवस, संजय धरणे, संदेश मयेकर नागेश मेयकर, प्रतीक राणे, मिलिंद धरणे, स्नेहल धरणे, अरविंद धरणे व ग्रामस्थ मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी आदी उपस्थित होते.
खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा मोठ्या गटात मृणाल सावंत प्रथम तर खुशी ठाकूर द्वितीय, शंकर गवस तृतीय क्रमांक मिळविला असून उतेजनार्थ दीक्षा नाईक हिने पटकावला. तर लहान गटात निधी खडपकर प्रथम, दुर्वा पावसकर द्वितीय, सोहम जांभोरे तृतीय, व उतेजनार्थ आरव आईर यांनी मिळविला,
सर्व विजेत्यांना रोख रक्कमेची पारितोषिके, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण सुनील मयेकर, दत्ताराम धरणे मुंबई यांनी केले. तीन दिवस दीपावली महोत्सवाच्या निमित्ताने फनी गेम्स, अचूक टिकली लावणे, वाटीत अचूक नाणे टाकणे, लुडो, मेणबत्ती लावणे, संगीत खुर्ची फक्त महिलांसाठी स्पर्धा झाल्या. तसेच सत्यनारायण महापूजा, यक्षिणी दशावतार मंडळ यांचा महान पौराणिक नाट्य प्रयोग आदी कार्यक्रम संपन्न झाले.